श्री गणपती आरती ( Shri Ganpati Aarti )
सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ।।1।। जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।धृ।। रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रूणझुणती नुपुरे चरणी घागरिया ।।२ ।। लंबोदर पीतांबर फणीवरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।।